सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

> इमीग्रेशन डेस्कजवळ दिपकने मला शेवटची गळा भेट म्हणून मिठी मारली आणि इतके दिवस रोखून धरलेला त्याचा आसवांचा बांध अखेर फुटला . आजून काही मिनिटात तो हा देश सोडून कायमचा परदेसी वास्तव्यासाठी निघून जाणार होता , त्याचे असे एकदम निघून जाणे मलाही गोंधळात टाकून जाणारे होते . परंतु त्याचा निर्णय झालेला होता आणि तो त्यावर अगदी ठाम होता. त्याला इथल्या जगण्यात आता रस राहिला नव्हता. त्याची जगण्याची उम्मेद , प्रेरणा त्याच्यातून कुणीतरी हिरावून नेल्यासारखा तो गेली काही महिने वागत होता . आतून तो पूर्णपणे तुटला होता, हे मला जवळचा  मित्र  म्हणून जाणवत होते . मात्र  त्याची जाणीव त्याने कुणाला कधी होऊ दिली नाही. त्याचे असे अचानक तुटण्याचे कारण काय असेल याचा मला अंदाज होता, परंतु प्रकरण इतक्या टोकाला जाईल असे वाटत नव्हते . अंजू तसी वागली याला काही कारण असू शकते हे त्याला परोपरीने समजाउनही तो तसे  मानायला  तयार नव्हता. मानेल तरी कसा . मला माहिती आहे त्याने तिच्यावर किती जीव ओवाळून टाकला होता . अंजू आणि दीपक ची भेट झाली ती तिच्या ल्ग्नानंतर . पहिल्याच भेटीत ती त्याला इतकी आवडली कि काही  दिवसांनतर  ती त्याचे  जगण्याचे एकमेव कारण बनली .  मात्र हे त्याने तिला कधी समजू दिले नाही .  कारण तो  कितीही  जीवापाड निरपेक्ष प्रेम करत असला तरी  ती दुसरी कुणाची तरी बायको होती  हे अंतिम सत्य तो जाणून होता . त्यामुळे त्याने पुन्हा कधी तिच्या समोर जाणेही टाळले . मात्र नियती कधी कधी माणसाच्या आयुष्याशी असा काही डाव खेळते कि होत्याचे नव्हते करून टाकते . यथावकाश दीपकचे लग्न झाले संसार वेलीवर दोन फुले फुलली . परंतु त्याच्या मनातली अंजू मात्र तशिच होती . प्रत्येक क्षणी तिचा निरागस  प्रेमळ चेहरा त्याला आठवायचा . तो चेहरा त्याच्या प्रत्येक कृतीमाग्ची मोठी प्रेरणा होता . भविष्यात कधी तिला भेटू , आपल्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहचवू असा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता इतके निर्व्याज आणि निखळ प्रेम तो तिच्यावर करत होता. भेटलो , जवळ आलो आणि तिला  हे कळले तर आहे ते प्रेमही जायचे म्हणून त्याने कधी भेटण्याचा प्रयत्नही केला नाही. असेच दिवसामागून दिवस आणि वर्ष जात होती . आणि एके दिवसी अचानक त्याच्या मोबाईल वरती एका अनोळखी नंबर वरून संदेश आला . नवीन वर्षाच्या शुभेछा  . खाली नाव होते अंजू   ...............क्रमश: